Sunday, August 31, 2008

Dimbivili Fast

खचाखच भरलेली लोकल
नेहेमीचाच गोंधळ आणि कोलाहल
साखळयांना लोंबणारे असंख्य देह
आणि त्यातही निर्माण झालेली एक लय

अचानक आरडाओरडा होतो
पकडो पकडो पाकिटमार पाकिटमार
पाठोपाठ शिव्यांचा भडिमार

एक विरुद्ध पन्नास असे
मग युद्ध सुरु होते
तो कळवळून ओरडत असतो
ते निर्दयपणे हात चालवत असतात
प्रत्येकजण मोका साधतो
संधी मिळताच हात धुवून घेतो

हे सगळं थांबवणारे दोन चार हात
येतात पण लगेचच दूर ढकलले जातात
उरलेले नव्याण्णव टक्के लोक
फुकट तमाशाची मजा लुटतात

प्रत्येकाच्या मनातला
रामन राघव जागा होतो
एक एकटा अभिमन्यु बघून
सगळ्यांचा कौरव होतो

शेवटी मारून मारुन त्यांची
मनगटे दुखू लागतात
मग थोड़े मागे होउन
ते घाम पुसू लागतात

तोही रडत भेकत आपल्या
जखमा चाचपत आसतो
फाटलेल्या पांढर्या सदरयाने
अंगावरचे रक्त पुसू लागतो

अचानक स्टेशन येते
तसा तो उठतो
रांगत रांगत धड्पड्त
खाली उडी मारतो

सगळे त्याच्याकडे
तुछापणे बघतात
आणि पुन्हा डब्याला लटाकतात
गाड़ी धड़द्हत निघून जाते

आता तो प्लात्फोर्म वर एकटाच
उरलेला आसतो
अजुनही व्हिवळत आणि कुंथत

अचानक त्याला आठवण येते

तो स्वताचा बूट चाचापू लागतो
बूटाच्या तलाव्यशी एक
कप्प्यातून पाकिट काढतो
आणि सर्व वेदना विसरून
नोट मोजू लागतो

मोजता मोजता खुदकन हसतो
म्हणतो - साला ! चांगलाच जाली
सकाळी सकाळी मस्त बोहनी जाली!