दोन जीवांमधलं नातं
श्वासाइतकच असावं
पहिल्या भेटीतच
अस्तित्वाची गरज बनावं!
त्या नात्यात भावनांनी
शब्दाची मदत घेऊ नये
आणि व्यवहारानेही जोत्यापलिकडे
पाय टाकू नये !
जमिनीशी रुजून असलेल्या
मुळाप॒रमणे ते घट्ट असावं
पण सिन्दबद्च्या म्हातारयाचा
मानेवरच जोखड नसावं!
त्या नात्याचे संपणेही
जुळण॒या इतकेच नैसर्गिक असावे
फुल्पखाराने निरोप घेताना
फुलानेही मंद हसावे!
Thursday, November 6, 2008
नेहेमी असं का होत?
नेहेमी गप्प गप्प असणारं
माझं घर तू आल्यावर
एकदम मोहरून उठतं,
नेहेमी असा का होतं?
नेहेमी डोक्यात वादळ
करणारे प्रश्न तू आल्यावर
कोपर्यात पडून रहातात
नेहेमी असा का होतं?
नेहेमी डोळ्यासमोर नाचणारे
शब्द तू आल्यावर
ओठा आड़ दडतात -
नेहेमी असा का होतं?
नेहेमी सय्यमानी बांधलेलं
मन तू आल्यावर मात्र
कुंपण तोडून धावू लागतं
नेहेमी असा का होतं??
माझं घर तू आल्यावर
एकदम मोहरून उठतं,
नेहेमी असा का होतं?
नेहेमी डोक्यात वादळ
करणारे प्रश्न तू आल्यावर
कोपर्यात पडून रहातात
नेहेमी असा का होतं?
नेहेमी डोळ्यासमोर नाचणारे
शब्द तू आल्यावर
ओठा आड़ दडतात -
नेहेमी असा का होतं?
नेहेमी सय्यमानी बांधलेलं
मन तू आल्यावर मात्र
कुंपण तोडून धावू लागतं
नेहेमी असा का होतं??
Subscribe to:
Posts (Atom)